Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

करुळ घाटाची कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

करुळ घाटाची कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

एकेरी वाहतूक १५ जानेवारी पर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्न करा

१० जानेवारीला पुन्हा कामाची पाहणी करुन निर्णय घेणार

दर्जेदार कामाबरोबर घाट मार्गाची सुरक्षितता तितकीच महत्वाची

संरक्षक भिंतीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

सिंधुदुर्ग : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहत आहोत. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (safety norms) प्राधान्य देत दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरूस्तीचे उर्वरित काम युद्ध पातळीवर पूर्ण करा. प्रवासी सुरक्षितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. १५ जानेवारी पर्यंत घाट मार्ग चालू होणार असे संबंधित विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र १० जानेवारीला पुन्हा घाट मार्गाची पाहणी करण्यात येईल. काम समाधानकारक झाल्यानंतरच १५ जानेवारीपासून एकेरी मार्ग (वैभववाडी ते कोल्हापूर) चालू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यंत्रणांनी त्या अनुषंगाने वेगाने काम करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.
करूळ घाट मार्गाची श्री राणे यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री घाटगे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, उपकार्यकारी अभियंता शिवनीवर आदी उपस्थित होते.


श्री राणे यांनी यावेळी संबंधित विभागाला महत्वपूर्ण सूचना दिल्या. दरडी कोसळणाऱ्या भागाच्या बाजूने बेस्टवॉल, रस्त्याच्या खालच्या बाजूने रिटेनिंग वॉलचे काम पूर्ण करावे, धोकादायक वळणांची कटिंग करावी, दरीकडील संरक्षक कठड्यांची उंची वाढवून ती अधिक मजबूत करण्याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. घाट रस्त्याच्या कामाबाबत जनतेला समाधान वाटलं पाहिजे. घाटमार्ग जनतेला व प्रवाशांसाठी सुरक्षित वाटला पाहिजे. कामाची गती वाढवावी. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच घाटमार्ग सुरू केला जाईल. संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी कामात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही श्री राणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना सुचना दिल्या. घाटातील रस्त्याच्या काही भागाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ते निकषानुसार करावे तसेच कांक्रीटीकरणाचे काम गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देशही श्री पाटील यांनी दिले.

rapan bottom