आदित्य बटावले | सावंतवाडी : नेमळे गावकर-कुंभारवाडी येथील श्री दत्त अनघालक्ष्मी व श्री योगेंद्रनाथ महाराज मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त श्री दत्त-अनघालक्ष्मी मंदिर सेवा समिती आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नेमळे (गावकर- कुंभारवाडी) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री दत्त- अनघालक्ष्मी मंदिर सेवा समितीच्यावतीने सत्यवान सोन्सुरकर यांनी केले आहे. रक्तदात्यांनी नितीन पांगम (८३९०१२२६९०) किंवा विजय सोनसुरकर, सिद्धार्थ पराडकर, दिनेश गावडे किंवा बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गमार्फत करण्यात आले आहे.

नेमळे येथे आज रक्तदान शिबीर
