Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मच्छीमारी नौकांना आधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

मच्छीमारी नौकांना आधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत चार हजारांहून अधिक नौकांसाठी यंत्रणा बसवली जाणार

मत्स्यविकास, बंदरे मंत्री नितेश राणे यांचे मंत्रिपद कोकण विकस व गतिमान निर्णयांसाठी ठरणार वरदान

मालवण | प्रतिनिधी : नामदार नितेश राणे यांच्या रूपाने हक्काचे मत्स्य विकास व बंदर मंत्री कोकण किनारपट्टीला लाभले आहेत. मत्स्य व्यवसाय व जनहिताचे निर्णय गतिमान होतील अश्या अपॆक्षा मच्छिमार बांधव व्यक्त करतं आहेत. यां पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील मच्छिमार नौकांना अद्यावत करण्यासाठी मस्त्य विभागाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. मच्छीमारी नौकांना आधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत असून यामुळे समुद्रात अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या मच्छीमारी नौकांपर्यत पोहचणे आता सहज शक्य होणार आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे चार हजारांहून अधिक मच्छिमार नौकांसाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो)कडून विकसित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या उपक्रमा अंतरंग देवगड मध्ये ७८१, मालवण ६२६, व वेंगुर्ला येथे ५३३ नौकांना स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचे प्रस्ताव आहेत. याच्या पहील्या टप्प्यात देवगड मध्ये ८८, मालवण १२९, वेंगुर्ला ३१ मिळून २२१ नौकांना ही यंत्रणा बसविण्यात आली असून आता पर्यंत ७५० सिग्नल यंत्रणा मत्स्य विभागाकडे प्राप्त झाली आहे. एकूण जिल्ह्यातील १९४० मासेमारी नौकांना हि यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार हून अधिक नौकांना ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या पैकी ८५९ सिग्नल यंत्रणा मत्स्य विभागाकडे प्राप्त झाल्या असून त्यातील ३५० नौकांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच ही सिग्नल यंत्रणा उर्वरित नौकांना बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर म्हणाले, स्वयंचलित नौकांवर स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्या नंतर मच्छीमारी नौकांवर असलेल्या खलाशी लोकांना इतराशी संपर्क साधने सहज शक्य होणार आहे. ही यंत्रणा उपग्रहाशी जोडलेली असल्याकारणाने खोल समुद्रामध्ये मासेमारी करणा-या खलाश्यांना सिग्नल नसल्याने होणारा त्रास दूर होणार आहे. सिग्नल या आधुनिक यंत्रामुळे समुद्रात असतानाही कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी चांगले साधन म्हणून उपलब्ध होणार आहे. कोणी मच्छिमार समुद्रात बुडत असेल, नौकेला आग लागली असेल किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत देण्यासाठी यंत्रणांना सूचित करणे आता अधिक सोपे होणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत जसे की, नौकेला आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास, नौकांवरील खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो. व त्यानुसार नौकेवरील नभमित्र अँपद्वारे नियंत्रण कक्षाकडुन संदेश प्राप्त होतो.

rapan bottom