मिली मिश्रा | सावंतवाडी : कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नेरूर देऊळवाडा यांच्या मनमानी कारभाराला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती,कोल्हापूर पाठीशी घालत असल्याचा आरोप नेरूर ग्रामस्थांनी केला असून श्री देव चाकर आणि नोकर यांनी सावंतवाडी येथील पश्चिम महारष्ट्र देवस्थान समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. आज सकाळपासून १५ ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. "खय तरी पाणी मुरता…..ते सगळा पाणी मुरता" असा बॅनर उपोषणस्थळी लावण्यात आला. तसेच हुकूमशाही,मनमानी आणि बेकायदेशीर पद्धत अवलंबल्याचा आरोप कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीवर करण्यात आला आहे.
या उपोषणाला सुहास नारकर, आनंद नारकर, प्रसाद पोईपकर, जयवंत मेस्त्री, सुरेंद्र घाडी, प्रथमेश मेस्त्री,निलेश मेस्त्री,अनिकेत मेस्त्री,मनोज चव्हाण, आशिष नेरूरकर,विवेकानंद नेरूरकर, प्रथमेश नेरूरकर, भरत नेवगी,अमित नाईक आदी बसले होते.

सावंतवाडीत कलेश्वर देवस्थान उपसमितीच्या कारभारविरोधात नेरूर ग्रामस्थांचे उपोषण.
