मिली मिश्रा | सावंतवाडी : तालुक्यातील मौजे नाणोस गावातील डोंगराळ भागात ग्राम प्रशासनास कोणतीही लेखी सुचना नदेता व गावातील ग्रामस्थांना विश्वासात नघेता फोमेंतो कंपनीने अनधिकृत रित्या सुरू केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम दि १३ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेतील ठरावानुसार त्वरीत बंद करण्याचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात यावेत,म्हणून ग्रामपंचायत नाणोसच्या व मायनिंग संघर्ष उप समिती नाणोसच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.तसेच खनिकर्म विभागाचे प्रभारी अधिकारी सौ.सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यावेळी सदर प्रकरणी संबधित अधिकाऱ्यांना त्वरीत बोलावून माहीती घेतली,व सदर प्रकरणाची फाईल मागवून घेतली,फाईल मधील कागदपत्रांची पाहणी करून याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा मायनिंग संघर्ष उपसमितीचे अध्यक्ष सागर नाणोसकर,ग्रा.पं.सदस्य विनायक शेट्ये,माजी सरपंच वासुदेव जोशी,माजी सरपंच राजाराम नाणोसकर आदी उपस्थित होते.

नाणोस गावात अनधिकृतरित्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण, ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
