मिली मिश्रा | वेंगुर्ला : उभादांडा - केपादेवी मंदिरा जवळ ऍक्टिवा स्कुटर ने (एम एच ०७ ए सी ५७८६) ऍक्सेस स्कुटर (एम एच ०७ ए पी ३३२०) व रिक्षा (एम एच ०७ ए एच ४१७२) या दोन गाडयांना धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान आहे. तर ऍक्टिवा स्कुटर वरील तिघेजण जखमी झाले आहेत. जखमीना स्थानिकांनी तात्काळ ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी तिघेजण उभादांडा येथे भाड्याच्या घरात राहतात, तसेच ते राजस्थान येथील असून ते येथील स्थानिक ठेकेदाराकडे कामाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.तर रिक्षा रेडी येथील आहे.
दरम्यान अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी गर्दी केली होती.तसेच स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी परिश्रम घेतले. उशिरापर्यंत अपघाताची खबर पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती.

उभादांडा येथील तिहेरी अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान, तिघेजण जखमी
