Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

होरपळून मृत्यू | आगीचा भडका

होरपळून मृत्यू | आगीचा भडका

मंगळवारी रात्री घडली घटना

मालवण : मालवण तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तवव्यास असलेले दिपक सखाराम परब बावकर (वय ५५) यांचा अगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यां घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.



चौके स्थळकरवाडीत राहणारे दिपक सखाराम परब(बावकर)हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत. गेली बरीच वर्षे पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घराने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा खोलण्याचा प्रयन्त केला मात्र दरवाज्याला आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने खोलता आला नाही. पाडवीतून आगीचे लोळ येत होते.याबाबत चौके पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येत मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग विजवण्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळलेल्या अवस्थेतील दिपक यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिनीने मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला.



यावेळी घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल जानकर, प्रतीक जाधव, महादेव घागरे, हेमंत पेडणेकर, चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर उपस्थित होते. आग नेमकी कशी लागली हे समजण्यात आले नाही. पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत

यावेळी प्रीतम गावडे, मंदार गावडे, बंड्या गावडे, प्रतीक गावडे, मोहन गावडे, भाई गावडे, प्रवीण गावडे यांच्यासह अनेक युवकांनी व ग्रामस्थानी आग विजवण्यासाठी धाव घेतली. जळलेल्या मयत दिपक(बावकर)याचा मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. दिपक परब यांच्या पच्छात पत्नी, 2 मुलगे, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

rapan bottom