Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

'पिंगुळी महोत्सव - २०२४' उद्यापासून

'पिंगुळी महोत्सव - २०२४' उद्यापासून

भव्य शोभायात्रेने होणार शुभारंभ

तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी

निलेश जोशी | कुडाळ : ग्रामपंचायत पिंगुळी, साई कला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव 2024 ला उद्या 25 पासून बॅरिस्टर नाथ क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे दिमाखात सुरुवात होत आहे. सायंकाळी 4 वा भव्य शोभायात्रेने विविध लक्षवेधी देखाव्यासह या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.  25 ते 27 या कालावधीत होणाऱ्या पिंगुळी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी त्याचबरोबर संपूर्ण भारतभर नावाजलेला मुंबईतील कलाकारांचा प्रसिद्ध बँड अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
   उद्या 25 डिसेंबर पासून पिंगुळी महोत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी महोत्सवाच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सरपंच अजय आकेरकर, बॅरिस्टर नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, उद्योजक गजानन कांदळगावकर, साई कला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम, अमित तेंडोलकर, पोलीस पाटील सतीश माड्ये, वैभव धुरी, मंगेश चव्हाण दिपक गावडे, बाबल गावडे, सचिन सावंत, प्रियदर्शन कुडव, मयूर लाड, निलेश,प्रभू, राज वारंग आदी उपस्थित होते
श्री देसाई म्हणाले, महोत्सवाच्या  पहिल्या दिवशी उद्या 25 डिसेंबरला सायंकाळी चार वाजता श्री देव रवळनाथ मंदिर ते बॅ नाथ पै क्रीडांगण या ठिकाणी भव्य मिरवणूक होणार आह. या मिरवणुकीत पिंगुळी गावाची महती सांगणारे चित्ररथ, ढोल पथक बैलगाडी देखावे, पांगुळ बैल ही  विविधता  महोत्सवात असणार आहे. महोत्सवाची  सुरुवात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ  होईल. यावेळी पिंगुळी गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार होणार आहे. सायंकाळी 7 वा कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल सादरीकरण, नवीवाडी महिलांचे टाळ नृत्य हा अनोखा कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता खेळ पैठणीचा तर रात्री नऊ वाजता मिस पिंगुळी सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा होणार आहे.
गुरुवार 26 डिसेंबरला गणेशवंदना सायंकाळी सहा वाजता मुक्काम पोस्ट कॉमेडीवाडी हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये टीव्ही कलाकार विश्वजीत पालव, कल्याणी साखळूनकर आणि मुकेश जाधव या कलावंताचा समावेश आहे . रात्री आठ वाजता नृत्य महोत्सव 2024 होणार आहे. शुक्रवार 27 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता गणेश वंदना,  त्यानंतर  पिंगुळी गावातील गायक, वादक,नृत्य कलाकार यांचा संगीतमय कार्यक्रम होणार. रात्री नऊ वाजता संपूर्ण भारतात नावाजलेला मुंबईतील कलाकारांचा प्रसिद्ध बँड अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होणार आहे.
दर दिवशी समारोपवेळी लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. दरम्यान या महोत्सवात विविध असे 80 स्टॉल सहभागी झाले आहेत. उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने विविध स्टॉल आहेत. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील ऑटो इंडस्ट्रियल स्टॉल या ठिकाणी असणार आहेत. महोत्सवाची सुरुवात आज पासून रांगोळी स्पर्धेने झाली आहे.
या पिंगुळी महोत्सवात जो निधी उपलब्ध होईल त्या निधीतून  गावासाठी सुसज्ज रुग्णवाहिका आणण्याचा मनोदय पिंगुळी महोत्सवाचे प्रमुख सरपंच अजय आकेरकर यांनी व्यक्त केला. या अगोदर दहीहंडी उत्सवात जो निधी जमा झाला आहे तो निधी सुद्धा यासाठी वापरला  जाणार आहे. पिंगुळी गावात 90 बचत गट आहेत. या बचत गटातील उपस्थित महिलांना भेटवस्तू तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रामपंचायत मार्फत कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. 27 ला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचा लाभ पिंगुळीवासियांनी घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. कचरा मुक्त पिंगुळी,वृक्ष लागवड मोहीम तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपला पिंगुळी गांव राज्यस्तरावर  कसा येईल या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

rapan bottom