मिली मिश्रा | सावंतवाडी : भिल्ल्वाडी ग्रुप मळगाव आयोजित सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दशावतार कलाकार नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ यांचा भव्य-दिव्य असा राम भक्तीपर आधारित दर्जेदार पौराणिक अध्यात्मिक ट्रीक्सीनयुक्त नाट्यप्रयोग "भक्त शिरोमणी संत कबीर" चे आयोजन १ जानेवारी २०२५ रोजी राञौ ठिक ९ वाजता मळगाव येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगात श्री.नितिन आसयेकर सोबत दीप निर्गुण, देवेश कुडव, बंड्या परब, किरण नाईक, रमेश खोत, रावजी तारी, गुरु वराडकर, रुपेश माने हे आपली कला सादर करणार,तसेच त्यांना हार्मोनियम सिद्धेश राऊळ, पाखवाजवादक प्रकाश मेस्त्री, झांझवादक कुणाल परब हे साथ देणार आहेत.
या ट्रीक्सीनयुक्त नाट्य प्रयोगाचा नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा,असे आवाहन भिल्लवडी ग्रुप मळगावचे अध्यक्ष श्री पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.

मळगाव येथे १ जानेवारी रोजी संत कबीर नाट्यप्रयोग.
