Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कुडाळ तालुक्यातील बीएसएनएल सेवा रुग्णशय्येवर !

कुडाळ तालुक्यातील बीएसएनएल सेवा रुग्णशय्येवर !

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांचा "टॉवरवरून" आंदोलनाचा इशारा

सेवेत सुधारणा झाली नाहीतर २६ जानेवारीला युवासेनेचे आंदोलन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ नगर पंचायत सभापती मंदार शिरसाट यांनी दिली.
बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात या एकाच कंपनीची सेवा सुरु होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राहक बीएसएनएल ग्राहक आहेत. मात्र केंद्र सरकारने मोबाईल सेवा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी बीएसएनएलचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे, असा आरोप मंदार शिरसाट यांनी केला.
ठराविक उद्योगपतींची भरभराट व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच बीएसएनएल सक्षम होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नादुरुस्त झालेले मोबाईल टॉवर्स जाणीवपूर्वक दुरुस्त करण्यात येत नाहीत. शिवसेनेचे विनायक राऊत खासदार असताना त्यांनी जिल्ह्यात मोबाईल टॉवर मंजूर करून घेतले होते. मात्र त्याच्या पूर्ततेकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. मोबाईल सेवेची अशी अवस्था असताना लँड लाईन सेवा देखील मृतवत झाली आहे. मोबाईल आणि लँड लाईन सेवा अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे इंटरनेटची सुविधा घेण्यात देखील अडथळे येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे. येथे आधीच मोबाईल नेटवर्कची बोंब असते. त्यातच भरवशाच्या बीएसएनएल सेवेने दगा दिला आहे. इंटरनेट सेवेचा खोळंबा होत असल्यामुळे सरकारी कामे देखील असून पडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार खेटे मारावे लागत आहेत. तसेच व्यापारी वर्गाला देखील बीएसएनएलच्या या सर्विसमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे मोबाईलवर येणारे ओटीपी तसेच बँकेचे ट्रांजेक्शन होणारे मेसेज देखील उशिरा येत आहेत
येणाऱ्या महिन्यात बीएसएनएलने सर्व समस्या सोडवल्या नाहीत तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी २६ जानेवारी रोजी कुडाळ येथे बीएसएनएल टॉवरवर चढून युवा सेनेच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे, यासंदर्भात बीएसएनएल ऑफिस येथे जाउन सब डिव्हिजन इंजिनिअर बलवंत कुमार यांची भेट घेऊन सेवेंतर्फ़े निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गावंडे, युवा सेनेचे शहर प्रमुख संदीप महाडेश्वर, गुरु गडकर प्रथमेश राणे उपस्थित होते अशी माहिती मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी दिली.

rapan bottom