Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

द ब्लाइंड वेल फेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या अंध बांधवांची सिंधुदुर्ग किल्ला भेट

द ब्लाइंड वेल फेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या अंध बांधवांची सिंधुदुर्ग किल्ला भेट

स्पर्शातून सिंधुदुर्ग किल्ल्याची अनुभूती

लायन्स क्लब मालवणचे सहकार्य

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग किल्ल्यात आम्ही बोटीने जात असताना समुद्राच्या लाटा काय असतात, याचा थरार आम्ही अनुभवला. सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्यता आम्ही आमच्या मनात साठवली…. किती ही भव्यता… हे शब्द आहेत नाशिक येथील द ब्लाइंड वेल फेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या अंध बांधवांचे. अंधांना अनुभूती होते ती स्पर्शातून. त्यांना फक्त स्पर्शाची भाषा कळते. अंध आहोत, फिरायला जाऊन काय बघणार, काय दिसेल? परंतु आमचा सिक्स सेन्स एवढा पावरफुल असतो की त्यामुळे आम्ही आमच्या आजूबाजूचे जग अनुभवतो. त्यातूनच आम्ही किल्ले सिंधुदुर्ग अनुभवला. असेही त्यांनी सांगितले.

नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर येथील द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर, सचिव दत्तात्रय पाटील यांसह ६० हून अधिक अंध सदस्य आपल्या परिवारासह मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलें होते.

यावेळी बोलताना द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर म्हणाले, येथे येवून अतिशय आनंद झाला. प्रत्येकाला ताण तणाव असतो तो ताणतणाव कुठेतरी कमी व्हायला हवा या उद्देशाने माणूस फिरायला बाहेर पडतो. त्याच उद्देशाने २० ते २५ डिसेंबर या कालावधीत पंढरपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच आदी व इतर ठिकाणी देखील आम्ही जाणार आहोत. आम्ही अंध असल्यामुळें प्रवासाला बाहेर पडताना नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु आम्ही आमच्या सिक्सेंस मुळे आम्ही सुध्दा सभोवतालचे जग अनुभवतो.

सिंधुदुर्ग किल्ला, बोटीचा प्रवास, तेथील समुद्राच्या लाटा काय असतात त्या आम्ही अनुभवल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती आम्हाला तेथील गाईडच्या माध्यमातून मिळाली. समुद्राची भव्यता आणि त्यामध्ये उभा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची अनुभूती घेवून आम्ही भारावून गेलो आहोत.

द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या या प्रवासात मालवण येथील लायन्स क्लबचे विशेष सहकार्य लाभले. अंध बांधव आणि त्यांच्या परिवाराच्या राहण्या - जेवणापासून अन्य सुविधांसाठी लायन्स क्लबने मदत केली. क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी, मुकेश बावकर, अरविंद ओटवणेकर, मिताली मोंडकर, राधिका मोंडकर, वैशाली शंकरदास, उदय घाटवळ, उमेश शिरोडकर, विराज आचरेकर, अनुष्का चव्हाण, दिशा गावकर, मनाली गावकर हे यावेळी उपस्थित होते.

rapan bottom