Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

महिलांच्या प्रश्नांबाबत उज्वला येळावीकर यांनी वेधले रुपाली चाकणकर यांचे लक्ष

महिलांच्या प्रश्नांबाबत उज्वला येळावीकर यांनी वेधले रुपाली चाकणकर यांचे लक्ष

ओरोस येथे भेट घेऊन दिले प्रश्नांबाबतचे निवेदन

प्रश्न सोडविण्याची केली मागणी

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या प्रमुख समस्या बाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला येळावीकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे लक्ष वेधले आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी श्रीमती चाकणकर याना गुरुवारी ओरोस येथे भेटून दिले.
श्रीमती चाकणकर यांना दिलेल्या निवेदनात सौ. येळावीकर यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या जीवनमानाशी संबंधित काही गंभीर समस्या आहेत, ज्या सोडवण्यासाठी महिला आयोगाकडून तातडीने हस्तक्षेप होणे आवश्यक आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाही. प्रसूतीसाठी आणि इतर आरोग्य समस्यांसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना दूरच्या शहरी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागते. तसेच शिक्षण व रोजगारः बाबत मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच कौशल्य विकासाच्या संधी मर्यादित आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या व उ‌द्योजकतेच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांवर नियंत्रणासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी लांब प्रवास करावा लागतो, पण सार्वजनिक वाहतुकीची सोय अपुरी असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण कार्यक्रमांची अंमलबजावणीः होणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी असलेले शासकीय कार्यक्रम व योजना प्रभावीपणे राबविण्यात काही प्रमाणात अडथळे येत आहेत. तरी वरील समस्या सोडवण्यासाठी आपण तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्वला येळवीकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनंतराज पाटकर, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजय येळावीकर आणि कार्तिक कदम उपस्थित होते. यावेळी श्रीमती येळावीकर यांनी रुपाली चाकणकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले.

rapan bottom