मिली मिश्रा | सिंधुदुर्ग : कोकण भूमीचे निर्माते आपले आराध्य दैवत श्री भगवान परशुराम यांच्या देवस्थानाचे तेंडोली येथे स्थापना करण्यात येत आहे.
दिनांक 20, 21 आणि 22 रोजी सकाळी सात वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दिनांक 24 रोजी संध्याकाळी सात वाजता "रायगडाला जेव्हा जाग येते" नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा पुढील प्रमाणे -
दिनांक 20 सकाळी सात वाजल्यापासून देवतावंदन, पुण्याहवाचन (संकल्पसिद्धी) मंडपप्रवेश, स्थलशुद्धी, मंडपप्रतिष्ठा, जलाधिवास, पूर्वार्ध अग्निस्थापन गृहस्थापन,वास्तुहवन इत्यादी कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच 1.30 वाजता नैवेद्य प्रसादास सुरुवात होणार आहे. याचप्रमाणे 21 व 22 रोजी विविध विधी कार्यक्रम पार पडतील. तरी सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

