प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळचे आयोजन
लाखो रुपयांची बक्षिसे
निलेश जोशी | कुडाळ : येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. ८ जानेवारी ते रविवार दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत कुडाळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील भव्य मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास रोख रु. १ लाख व आकर्षक चषक व उपविजेत्या संघास ५० हजार रु. व आकर्षक चषक. तसेच अन्य बक्षिसे देण्यात येणार आहेत. जास्तीत संघानी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत संघाला रोख रु. ५,५५५/- प्रदीप माने यांजकडून, उपांत्य सामन्यात पराभूत संघाला रोख रु. ५,५५५/- अनिल कुळकर्णी यांजकडून, अंतिम सामना सामनावीर रोख रु. २,५५५/- महेश कुडाळकर यांजकडून, उपांत्य सामानातील सामनावीर रोख रु. २,५५५/-. बंड्या सावंत यांजकडून, उपांत्य सामन्यातील सामनावीर रोख रु. २,५५५/- नितीन परब यांजकडून ,अंतिम सामना सामनावीर ऑरेंज मिक्सर अतुल सामंत यांजकडून, उत्कृष्ट फलंदाज रोख रु. २,५५५/- चंद्रशेखर बाईत यांजकडून, उत्कृष्ट गोलंदाज रोख रु. २,५५५/- वैभव परब यांजकडून, उत्कृष्ट यष्टिरक्षक रोख रु. २,५५५/- कौस्तुभ पाटणकर यांजकडून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रु. २,५५५/- अरूण खानोलकर यांजकडून, मॅन ऑफ दी सिरीज आकर्षक भेटवस्तू अतुल सामंत यांजकडून, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच आकर्षक भेटवस्तू अरूण खानोलकर यांजकडून दिली जाणार आहे.
या स्पर्धेत मर्यादित संघ घ्यावयाचे असल्याने आपल्या संघाची नावे प्रवेश फी सह दिनांक १ जानेवारी २०२५ पर्यंत सुनिल धुरी (मोबा. ९४२१२६१३००), सचिन कांबळी (मोबा. ९४२३३०४१५९) या प्रतिनिधींकडे देण्यात यावीत. स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. ५,०००/- असून आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गुगल पे द्वारे नितीन नेमळेकर, (मोबा. ९४२२०७५६२३) या मोबाईल क्रमांकावर प्रवेश फी भरण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

