Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सिंधुदुर्ग कॉलेजच्या राहुल चव्हाणची दिल्ली येथील गणतंत्र दिवस परेड साठी निवड

सिंधुदुर्ग कॉलेजच्या राहुल चव्हाणची दिल्ली येथील गणतंत्र दिवस परेड साठी निवड

महाराष्ट्रातील निवडक कॅडेड होणार सहभागी : सिंधुदुर्ग कॉलेज साठी ऐतिहासिक क्षण

मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण राष्ट्रीय छात्र सेना विभागा (एनसीसी) कॅडेट एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर राहुल चव्हाण याची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या रिपब्लिक डे कॅम्प साठी निवड झाली आहे.

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या यां सोहळ्यात संचलन होते, प्रत्येक राज्याचे रथ व वेगवेगळे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर केले जातात. भारतातील आर्मी, नेव्ही, एअर फोर्स जवान परेड संचलन साठी उपस्थित असतात. याबरोबरच भारतातील प्रत्येक राज्यातून काही एनसीसी कॅडेट सिलेक्ट केले जातात हे सुद्धा परेड संचलनामध्ये सहभागी असतात. यावेळी देशातील प्रत्येक राज्यातून ठराविक एनसीसी कॅडेटची निवड होते. महाराष्ट्रातून मालवण येथील राहुल उदय चव्हाणची निवड झालेली आहे.

सिंधुदुर्ग कॉलेजसाठी ही ऐतिहासिक घटना आहे. आजपर्यंत कॉलेजच्या इतिहासामध्ये असा क्षण नव्हता. मात्र राहुल या एनसीसी विद्यार्थ्याच्या माध्यमातून ही पहिली निवड आहे. या विद्यार्थ्याने सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे, मालवणचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचविले आहे. मालवणच्या नावलौकिकामध्ये राहुलने भर घातलेली आहे.

राहुल हा तथा सिंधुदुर्ग महाविद्यालय टी.वाय.बी. कॉम वर्गात शिक्षण घेत असून एनसीसीच्या तिसऱ्या वर्षाला त्याचा प्रवेश आहे. तसेच तो एनसीसीचा सीनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करतो, 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालिय मार्फत त्याचे सिलेक्शन झालेले आहे. सलग तीन महिने, दहा- दहा दिवसाचे कॅम्प आर्मीकडून आयोजित केले जातात. त्या प्रत्येक कॅम्पमध्ये त्याचे सिलेक्शन झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार एनसीसीचे विद्यार्थी आहेत त्यापैकी हा एकमेव विद्यार्थी आहे. ज्याचे दिल्लीला सिलेक्शन झालेले आहे. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि इतर आर्मी ऑफिसर यांनी राहुलचे ट्रेनिंग घेतले. सिंधुदुर्ग कॉलेज लेफ्टनंट प्राध्यापक एम.आर. खोत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. दिल्लीसाठी सिलेक्शन होणे म्हणजे अत्यंत कठीण बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कौतुकस्पद बाब आहे.असे कर्नल दीपक दयाल (उत्तर प्रदेश) यांनी व्यक्त केले.

एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत, सिंधुदुर्ग कॉलेज मालवणचे प्राचार्य डॉ .शिवराम ठाकूर यांनी राहुलचे अभिनंदन केले आहे. त्याला 26 जानेवारीची परेड झाल्या शिवाय मालवणला परत येता येत नाही. त्यामुळे फोनवरूनच कौतुक केले.
त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ साईनाथ चव्हाण, संदेश कोयंडे , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी राहुलचे अभिनंदन केले. कॉलेजचे प्राध्यापक, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनीही राहुलचे अभिनंदन केले. आणि मालवण साठी हे एक कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला.

58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी राहुलचे विशेष कौतुक केले. कॉलेजमधील इतिहासातील ही एक ऐतिहासिक घटना आहे जी कायमस्वरूपी कॉलेजच्या आणि मालवणच्या इतिहासामध्ये नोंद राहील असे उदगार कॉलेजचे माजी एनसीसी अधिकारी गिरसागर सर, काटकर सर, उज्वला सामंत मॅडम यांनी व्यक्त करताना राहुलचे अभिनंदन केले.

राहुल हा टोपीवाला हायस्कूलला शिक्षण घेत असतानाच सिंधुदुर्ग कॉलेजचे खोत सर यांच्या संपर्कात होता. टोपीवालाच्या ग्राउंड वर 26 जानेवारीला एनसीसी पोलीस पथक होमगार्ड यांची परेड चालू असताना ढोल वाजवण्यासाठी टोपीवाला हायस्कूल कडून उपस्थित असायचा. त्याचवेळी त्याने एनसीसी मध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले होते "बारावीनंतर तो सिंधुदुर्ग कॉलेज कॉलेजला एफ वाय बी कॉम ला आणि त्याचबरोबर एनसीसी मध्ये दाखल झाला. या विद्यार्थ्याने इतिहास घडवला. माझा एक तरी विद्यार्थी दिल्लीला परेड करण्यासाठी जावा हे हे माझे होते. आणि ते स्वप्न राहुल या विद्यार्थ्याने पूर्ण करून दाखवले. अशी प्रतिक्रिया राहुलचे मार्गदर्शक लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत सर यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी 58 महाराष्ट्र बटालियन चे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आणि मालवणचे नाव त्याचबरोबर सिंधुदुर्ग कॉलेजचे नाव दिल्लीपर्यंत पोहचवले असे खोत सर यांनी सांगितले.

rapan bottom