निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यात हिर्लोक येथील आंबेडकरवाडी येथे जादूटोणा करणारी अघोरी कृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना कुडाळ पोलिसांनी अटक करून कुडाळ येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकार तर्फे सरकारी वकील चव्हाण यांनी बाजू मांडली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रितम कदम, अनिल पाटील, महीला पोलीस ज्योती रायशिरोडकर असे सदर ठिकाणी जाऊन वस्तूस्थितीची खात्री केली व घरात उपस्थीत असलेले आरोपीत विशाल विजय जाधव (वय ३०), रा. घर नं. ३५३, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रु.नं. १, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे (पश्चिम), सुमित मिलींद गमरे (वय ३३) रा. मु.पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर, साईनिवास सोसायटी, बि.नं. 9, रु.नं. 709, ता. चिपळूण जि. रत्नागिरी, सौ. हर्षाली विशाल जाधव पुर्वाश्रमीची समृध्दी अविनाश हडकर, (वय ३५) रा. घर नं. ३५३, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रु.नं. १, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोवीवाळी, ठाणे (पश्चिम), अविनाश मुकुंद संते (वय ३२) रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे, व दिनेश बालाराम पाटील (वय ३४) रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे हे मिळून आले होते.
दरम्यान या पाचही जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

हिर्लोक जादूटोणा प्रकरणी पाच जणांना २१ पर्यंत पोलीस कोठडी
