Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

१४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे २० डिसेंबरला उदघाटन

१४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे २० डिसेंबरला उदघाटन

चिवला बीच येथे २१ व २२ डिसेंबर रोजी स्पर्धेचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने २१ व २२ रोजी करण्यात आले आहे. सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या सागरी जलतरण क्षेत्रातील नवनवीन प्रयत्नांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना १४ व्या जिल्हास्तरीय सागरी जलतरण स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. दिपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांनी केले आहे.

स्पर्धेसाठी 'सागरी जलतरणाच्या नवोन्मेषाच्या दिशा' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक परब व राजेंद्र पालकर यांनी ही माहिती दिली.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष बाबा परब, निल लब्दे, समीर शिर्सेकर, खजिनदार अरूण जगताप, सहसचिव किशोर पालकर, सदस्य सुनील मयेकर, मिलींद राणे, प्रमुख सल्लागार डॉ. राहुल पंतवालावलकर, कायदेशीर सल्लागार अॅङ आर. एम. नाखवा, अॅङ संदीप जिनसेवाले, उद्योजिका चारुशिला आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, रूजारिओ पिन्टो तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२० रोजी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने १० किमी., १ व २ किमी. फिन्स स्विमिन्ग, आणि दिव्यांग व ५०० मीटर (६ व ७ वर्ष) स्पर्धकांची नोंदणी दुपारी २ वाजल्यापासून काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट, चिवला बीच, मालवण येथे सुरु होईल. सायंकाळी ५.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट तसेच बीच कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभ सायंकाळी ७ वाजता चिवला बीच, मालवण येथे होणार आहे.

२१ रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करुन महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या स्पर्धेला सकाळी ६ वाजता १० किमी स्पर्धेची सुरुवात होईल. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने १, २, ३, व ५ किमी स्पर्धकांची नोंदणी दुपारी ३ वाजल्यापासून व सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व उद्घाटन समारंभ काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट, चिवला बीच येथे सुरु होईल. तसेच बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन समारंभ सायंकाळी ७ वाजता चिवला बीच, मालवण येथे होणार आहे. २२ रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करुन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या स्पर्धेला सकाळी ६ वाजता ५ किमी स्पर्धेची सुरुवात होईल. २१ व २२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ होईल व २२ रोजी दुपारी ४ वाजता स्पर्धेचा समारोप केला जाईल, असे परब यांनी सांगितले.

rapan bottom