शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
आक्रमक, अभ्यासू आणि खंबीर हिंदु धर्मरक्षक नेतृत्व मंत्रिमंडळाला लाभले
मालवण | प्रतिनिधी : राणे साहेबांप्रमाणे आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वगुण आमदार निलेश राणे, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वातून नेहमीच दिसून येतात. दोन्ही नेतृत्व विधानसभेत आमदार म्हणून आहेतच त्या सोबत नितेश राणे कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यभर कार्यरत असणार आहेत. हा दुग्धशर्करा योग आहे. आक्रमक, अभ्यासू आणि खंबीर हिंदु धर्मरक्षक नेतृत्व म्हणून ओळख प्राप्त असलेले नितेश राणे कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राज्यात उमटवतील. असा ठाम विश्वास शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात गतिमान प्रगती साध्य करतं असताना महायुती सरकारचे नव्या दमाचे मंत्री राज्याला लाभले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला नितेश राणे यांच्या रूपाने मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद विकासाचे नवे पर्व घेऊन येणार आहे. खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतीची नवी दिशा सर करेल.
कणकवली मतदारसंघातून आमदारकिची हॅट्रिक केलेले नितेश राणे मंत्री पदाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपुर्ण राज्याला न्याय देतील. आपल्या कार्याचा ठसा ते राणे साहेबांप्रमाणे निश्चितच ठळकपणे उमटवतील यात शंका नाही. सोबतच हिंदु धर्मरक्षक म्हणून त्याचे कार्य अभिमानास्पद असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.

