Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण संस्थेचे 'ओऍसिस' नाटक प्रथम

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण संस्थेचे 'ओऍसिस' नाटक प्रथम

मालवण : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण या संस्थेच्या 'ओऍसिस' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच सातार्डे मध्यवर्ती संघ, कवठणी या संस्थेच्या 'गावय' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सिंधुदुर्ग केंद्रावरील अन्य निकाल असा - सिध्दांत फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या 'तुम्हाला काय वाटतं ?' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन- प्रथम- पारितोषिक हेमंत कदम (नाटक-ओऍसिस), द्वितीय- पारितोषिक रुपेश कवठणकर (नाटक- गावय), प्रकाश योजना प्रथम- शाम चव्हाण (नाटक - ओऍसिस), द्वितीय - केदार सामंत (नाटक- द कॉन्शन्स), नेपथ्य- प्रथम- राजू रेगे (नाटक- गावय), द्वितीय- श्रीराज बादेकर (नाटक ओऍसिस), रंगभूषा- प्रथम - संजय जोशी (नाटक- गावय), द्वितीय- प्रथमेश सामंत (नाटक ओऍसिस) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक - रविंद्र हळदणकर (नाटक- गावय) व शुभदा टिकम (नाटक ओऍसिस), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ईशा माळकर (नाटक- तनमाजोरी), वैभवी सोकटे (नाटक- श्याम तुझी आवस इली रे), रुपाली परब (नाटक- तुम्हाला काय वाटतं ?), कीर्ती सांगळे (नाटक- मुक्काम पोस्ट भोकरवाडी), प्रसाद खानोलकर (नाटक-तुम्हाला काय वाटतं ?), प्रा. प्रदीप होडावडेकर (नाटक- सूर्यास्त), चतुर पार्सेकर (नाटक- चार बापांचा मुलगा), मिलिंद कासार (नाटक- मिशन ५९)
१ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह, वेंगुर्ला व मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत अत्रे, विजय रावळ आणि श्रीमती मृणालीनी (मंजुषा) जोशी यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

rapan bottom