मालवण : पंचायत समिती मालवण शिक्षण विभाग आणि मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचलित ओझर विद्यामंदिर कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ व्या मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे दि. १७ व १८ डिसेंबर रोजी ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
१७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ११ वाजता निबंध स्पर्धा व दुपारी २ वाजता वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता विज्ञान प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य, प्रायोगिक साधने यांचे परीक्षण होणार आहे.
१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा व दुपारी २ वाजता पारितोषिक वितरण समारंभ व विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. तरी सर्वांनी विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला व सादरीकरणाला प्रेरणा द्यावे असे आवाहन ओझर विद्यामंदिर प्रशालेतर्फे करण्यात आले आहे.

