आमदार नितेशजी राणे यांना मंत्रिपदाबाबत भाजपा नेतृत्वाकडून फोन
सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातून मोठया मताधिक्याने विजयी होत आमदारकीची हॅट्रिक करणारे हिंदुत्ववादी नेते आमदार नितेश नारायणराव राणे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. नागपूर येथे आज राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असून आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपा पक्ष नेतृत्वाकडून फोन करण्यात आला आहे. भाजप कडुन मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी अग्रक्रमाने हिंदू धर्मरक्षक आमदार नितेश राणे यांना फोन करण्यात आला आहे. सायंकाळी शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.

