कुडाळ : कुडाळ - बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. अनेक शाळकरी मुलांना देखील याच रस्त्यावरून ये - जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात देखील घडले आहेत. विशेष म्हणजे वर्क ऑर्डर निघून देखील या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. तेव्हा लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

