मालवण : मालवण चिवला बीच सेवांगण मार्गांवरील वीज खांब मधून काहीसा तुटल्याने धोकादायक स्थितीत होता. स्थानिक नागरिकांनी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
यतीन खोत यांनी वीज विभागाचे लक्ष वेधून तात्काळ वीज खांब बदलण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार धोकादायक स्थितीतील वीज खांब बदलण्यात आला आहे.
चिवला बीच हे मालवणच्या सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. होम स्टे, हॉटेल यांच्याही संख्या याठिकाणी आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम ऐन पर्यटन हंगामात व्यवसायावर होऊ नये यां दृष्टीने तत्परतेने कार्यवाही झाल्याने नागरिकांनी यतीन खोत यांसह वीज विभागाचे आभार मानले.

