निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ आक्रमक
भाऊ भोगले | बागायत : बागायत येथे भूमिगत पद्धतीने इलेक्ट्रिक केबल टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी जे.सी.बी.चा वापर करून चर मारण्यात आला आणि आज दुपारी त्यात केबल टाकून त्यावर निकृष्ट दर्जाचे कव्हर देण्यात आले..मारण्यात आलेला सर हा तंत्रशुद्ध पद्धतीने खोल नाही त्याचप्रमाणे केबल साठी असणारे सिमेंट कव्हरही योग्य नाही हा सर्व प्रकार लक्षात येतात बागायत येथील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले श्री सुरज धामापुरकर यांनी तात्काळ पाहणी करून काम थांबविले व गावातील ग्रामस्थांना बोलावून सर्व चुकीच्या कामाचा उलघडा केला.

स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येऊन सुरू असलेले काम चुकीचे असल्याने ते त्वरित थांबून टाकलेली संपूर्ण केबल बाहेर काढण्यास भाग पाडले. त्यानंतर उतरवून ठेवण्यात आलेल्या केबलची पाहणी करता असे लक्षात आले की केबल वर असलेले इन्सुलेशन हे उत्कृष्ट नसून तेही निकृष्ट दर्जाचे आहे
स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस पाटील माळगाव श्री किशोर जाधव यांच्या निदर्शनास सर्व प्रकार आणून दिला व ठेकेदाराला याचा जाव विचारण्यास सांगितला मात्र ठेकेदार उपस्थित होऊ शकला नाही स्थानिकाच्या मतानुसार नेमून दिलेले काम हे शासनाच्या अटी शर्तीनुसार तसेच तंत्रशुद्धतेप्रमाणे होणे आवश्यक आहे तसे नसल्यास यापुढेही ग्रामस्थ हे काम होऊ देणार नाहीत कारण सदर काम हे एकदाच होणार आहे आणि खांबावरून मेलेल्या तारांमधील दोष काढणे जेवढे सोपे आहे तेवढे जमिनीखालून टाकलेल्या केबलचा दोष शोधणे शक्य होणार नाही आणि अशा मुळे भविष्यात वारंवार होणाऱ्या दोषाला जबाबदार कोण राहणार असे सर्वांमध्ये विचारण्यात आले यावर पोलीस पाटील यांनी ठेकेदाराला मोबाईल वरून सर्व माहिती दिली आणि ठेकेदाराने निविदेप्रमाणे काम करून देण्याचे मान्य केले.



