Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा एकदिवसीय सेमिनार संपन्न

जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा एकदिवसीय सेमिनार संपन्न

कुडाळ येथे आयोजन

जीएसटी बाबत अनेक मुद्द्यावर चर्चा

निलेश जोशी | कुडाळ : गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने जीएसटी आणि टॅली प्राइम 5.1 या विषयावर आयोजित सेमिनार कुडाळ येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सीए शैलेश मुंडये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जीएसटी कायदा, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सेमिनारला जिल्हाभरातून जीएसटी प्रॅक्टिशनर्स उपस्थित होते.
प्रथम सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक ॲड. अभिजित बेर्डे यांनी जीएसटी ॲमनेस्टी योजना आणि जीएसटी कायदा कलम १६(४) अन्वये केलेल्या ऑर्डर वरील उपाययोजना या बाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्गचे जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित पोरे यांनीही उपस्थित राहून समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले.


दुपार सत्रात इन्कम टॅक्स ऑफिसर (टीडीएस) कोल्हापूर राम यादव यांनी टीडीएसच्या संदर्भातील सल्लागारांच्या प्रत्यक्ष येणाऱ्या समस्या जाणून घेत, त्यावर बहुमोल मार्गदर्शन केले. यानंतर केदार वझे यांनी टॅली प्राइम ५.१ या नवीनच आलेल्या अपडेट बाबत सखोल माहिती दिली. त्यांनी प्रामुख्याने या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेळेची बचत करत, अचूक काम कसे करता येईल याची व्यवहारातील प्रात्यक्षिके दिली.
सेमिनारला जिल्ह्यातील विविध कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाऊंटंस् यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्ञानवर्धक सत्रांमुळे सहभागी सदस्यांना जीएसटीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यास आणि टॅली प्राइमचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले.

सीए शैलेश मुंडये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सेमिनार मध्ये सूत्रसंचालन सीए युगांत चव्हाण यांनी केले तर सीए जबक मालदार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेच्या सेमिनार कमिटी पदाधिकारी सीए जबक मालदार, सीए सर्वेश प्रभुखानोलकर, सदानंद सामंत, भूषण तेजम, अमेय पालव यांनी विशेष परिश्रम घेतले.

rapan bottom