Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर कारवाई होणार !

अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर कारवाई होणार !

कुडाळमध्ये सर्वधर्मीयांच्या बैठकीत पोलिसांच्या सक्त सूचना 

आमदार निलेश राणे यांच्या मागणीची त्वरित दखल 

निलेश जोशी | कुडाळ : शिवसेना आमदार निलेश राणे यांची अनधिकृत भोंग्या संदर्भात दिलेल्या पत्राची कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तात्काळ दखल घेतली.  गुरुवारी कुडाळ पोलीस ठाणे येथे सर्वधर्मीयांची बैठक आयोजित करून सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर अनधिकृत भोगे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत या बैठकीत दिले.  कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या अन्यथा कायद्यानुसार कारवाई करावी लागेल असेही त्यांनी सांगितले.


     आमदार निलेश राणे यांनी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना अनधिकृत धार्मिक भोंगे संदर्भात कारवाई करण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली होती.  सध्या धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे.  न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने दोन्ही प्रदूषणांविषयी नियमावली निश्चित केली आहे.  त्यामध्ये शांतता क्षेत्रात रात्री  ४० तर दिवसा आवाजाची मर्यादा  ५० डेसिबल इतकी असावी.  भोंगे लावल्याने कायद्याचे उल्लंघन होत नाही.  मात्र त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची अनुमती घेऊन व वरील आवाजाच्या मर्यादित ते लावणे बंधनकारक आहे.  मात्र अजान देताना त्याचे पालन होत नाही.  त्यामुळे अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनी प्रदूषण या संदर्भात कुडाळ  तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यांवर धडक कारवाई करावी अशी मागणी राणे यांनी केली होती.  ही मागणी केल्याच्या २४ तासाच्या आत श्री. मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी सायंकाळी आयोजित केली होती.  यात श्री. मगदूम यांनी मार्गदर्शन आणि काही सूचना केल्या. 


    यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेनुसार राज्य शासनाने २०१७ मध्ये आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार कोणत्याही समारंभामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डीजे, ढोल पथक असेल तर त्याची परवानगी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा मंदिर मस्जिद किंवा अन्य ठिकाणी स्पीकर लावायचे असेल तर परवानगी घेणे गरजेचे आहे. यापुढे अशा परवानगी घेतल्या गेल्या नाही आणि शासनाने ठरवलेल्या आवाजाच्या मर्यादेबाहेर स्पीकर आवाज असेल तर गुन्हा दाखल केला जाईल. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा दाखल होईल असे त्यांनी सांगितले. तसेच कायमस्वरूपी ज्यांचे स्पीकर मंदिर, मस्जिदवर आहेत. त्यांनी दर तीन महिन्यांनी परवानगी घेऊन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.  नियमाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्वधर्मीय उपस्थित होते.

rapan bottom