मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांची 112 वी जयंती तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार सचिव योगेश वराडकर यांनी केले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंत आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुष्पहार घालण्यात आला. संग्राम कासले यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले. कोषाध्यक्ष सुर्यकांत कदम यांनीदेखील मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संकेत पेंडूरकर, लीलाधर तळगाकर,अमोल तळगावकर, निळकंठ तळगावकर, सौ. पौर्णिमा कासले उपस्थित होत्या. तालुकाध्यक्ष रविकांत यांनी मार्गदर्शन करुन आभार मानले. सरणेतय गाथा घेऊन समारोप करण्यात आला.

