अदित्य बटावले | सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाला भेट देत विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडीत होणाऱ्या कोकण प्रांत अधिवेशनात आपण नक्कीच उपस्थिती दर्शवू,असे आश्वासन त्यांनी दिले.
विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत होत आहे.या परहवभुमी वर त्यांनी ही भेट दिली.
यावेळी त्यांनी अधिवेशनाची माहिती घेवून विद्यार्थ्यांशी चर्चा केली व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अधिवेशन स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, व्यवस्था सहप्रमुख डॉ. राजशेखर कार्लेकर, शहर मंत्री स्नेहा धोटे, व्यवस्थाप्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, तुषार पाबळे, विनीत परब,सौरभ दांडगे, सिद्धेश म्हापसेकर, दिग्विजय पाटील, जयवंत पवार, गौरी वारंग आदी उपस्थित होते.

