मालवण : मालवण तालुक्यातील काळसे होबळीचा माळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा होणार आहे.
यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १२:३० या वेळेत पूजा होम हवन व आरती होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी ५ वाजता श्री बाळू वझे भटजी यांचे प्रवचन होणार आहे, त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी गुरुवर्य अमित मेस्त्री यांचे शिष्य बुवा रुपेश येमकर यांचे सुस्वर भजन होणार आहे, रात्रौ ८:३० वाजता ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे, तरी यानिमित्त सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त मोरजकर परिवार व काळसे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

