मिली मिश्रा | कुडाळ : नगरसेवक उदय मांजरेकर यांची कुडाळ नगरपंचायत बांधकाम व पर्यटन सभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन उदय मांजरेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट, नगरसेविका श्रेया गावंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका आफ्रीन करोल, नगरसेविका श्रुतीवर्धन आदी उपस्थित होते.

नगरसेवक उदय मांजरेकर यांची नगरपंचायत बांधकाम व पर्यटन सभापती पदी बिनविरोध निवड
