श्री भराडी देवीचा शनिवार 22 फेब्रुवारी 2025 ला वार्षिकोत्सव
अमित खोत | मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षिकोत्सव आंगणेवाडीची जत्रा शनिवार 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.
आज गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.
दरवर्षी प्रथेप्रमाणे धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन वार्षिक उत्सवाची (जत्रेची) तारीख निश्चित होते. त्यानुसार यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
अमित खोत
मोबा : 9404457788


