Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

नवदुर्गा : सौ. अनिता आप्पा आळवे

नवदुर्गा : सौ. अनिता आप्पा आळवे

  • कष्टकरी कर्तृत्वाचा आदर्शवत जीवनप्रवास

💐 नवदुर्गा : पुष्प पाचवे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे… प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम….
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

प्रत्येक महिला ही देवीचेच रूप असते. हीच महिला रुपी देवी नानाविध रूपांनी समाजात वावरत असते. संघर्ष व कष्टमय जीवन प्रवासातून समाजात आदर्श निर्माण करत असते. यापैकीच एक नारीशक्ती मालवणच्या सौ. अनिता आप्पा आळवे या होय.

मूळ मालवण देवली गावातील अनिता आळवे या मालवण शहरात वास्तव्यास आहेत. त्यांचे पती नोकरीनिमित्त गुजरातला असून अनिता या आपल्या मुलगी व मुलगा यांच्यासमवेत मालवणात राहतात. दोन दशकांपूर्वी त्यांनी बहिणीच्या सल्ल्यानुसार चहा-नाष्टाचा व्यवसाय सुरू केला. मालवण शहरात सायकल वरून फिरून त्या चहा विक्री करतात. चहा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दिवसभर फिरणाऱ्या ह्या स्त्री शक्तीचे प्रचंड श्रम आहेत. मात्र नेहमी हसतमुख चेहरा असणारी ही माऊली खऱ्या अर्थाने मालवणच्या कष्टकरी कर्तृत्वाचा अभिमान आहे.

त्यांचा अनिता आळवे यांनी नव्वदच्या दशकात होमगार्डमधून 12 वर्षे सेवा बजावली. त्यांनतर पोस्टात एजंट म्हणून काही वर्षे काम केले. एक उत्तम गृहिणी असणाऱ्या अनिता यांच्या हातालाही ‘चव’ आहे. तिच्या बहिणीने तिला चहा नाश्ता विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन सुरू झाला सायकलवरून चहा विक्रीचा व्यवसाय. अनिता आळवे यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. चहा-नाष्टाची तयारी झाल्यावर सकाळी ९ ते १० वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत त्या सायकल चालवत चहा-कॉफीची विक्री करतात. त्यानंतर दुपार ते सायंकाळ पर्यंत असा नित्यनियमाने व्यवसाय करतात. रात्रीच्या वेळी खानावळी साठी रुचकर डबे विक्री ही त्यांनी केली. दिवसभर १५ ते १८ तास या माऊलीचे कष्ट व मेहनत सुरू असते. चहा व्यवसायातून दोन मुलांचे शिक्षण व संसाराचा गाढा यशस्वीपणे सांभाळला. अनिता आळवे यांची मुलगी निकीता व मुलगा अजय यांचे पदवीपर्यत शिक्षण झाले. मूले जमेल त्या प्रमाणे आईला मदत करतात.

चहा व्यवसायाबरोबरच दोन वर्षांपूर्वी आळवे यांनी पतसंस्था पिग्मी एजंटचा पेशा स्वीकारला आहे. सुरवातीला व्यवसाय उभारण्यासाठी अनिता यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी स्थानिक बँकाकडून कर्ज काढून त्यांनी व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली आणि अथक प्रयत्नांनी त्यात सातत्य राखले. संघर्षमय जिवन प्रवासात अनेक चढ उतार त्यांनी पाहिले. मात्र जिद्द कायम ठेवली. कोरोना लॉक डाऊन काळात सर्वच ठप्प असल्याने या माउलीलाही मोठा फटका बसला. कर्ज थकले, मात्र पुन्हा एकदा नव्या दमाने त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. मेहनतीने यशस्वी

एकूणच या माऊलीचा जिवन प्रवास पुढील काळात सुखद व आनंददायी होवो. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच प्रार्थना. स्काय न्यूज टुडे परिवाराच्या वतीने अनिता आळवे आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा.

rapan bottom