Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

महाविकास आघाडीतर्फे कुडाळमध्ये 'जोडे मारो' आंदोलन

राजकोट दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारचा केला निषेध

कुडाळ : महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ गांधी चौक येथे सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याला राज्य शासन जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली. सरकार विरोधातल्या घोषणांनी पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.


२६ ऑगस्ट रोजी राजकोटमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्याभर सरकारला जोडेमारो आंदोलन केले जात आहे. कुडाळ गांधी चौक येथे सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार देखील करण्यात आला. प्रत्यक्ष जोडे मारो आंदोलनाच्या वेळी मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या नेत्यांचे फोटो असलेला बॅनर हिसकावून घेतला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली.


या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना ठाकरे गट युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, शिवाजी घोगळे, प्रसाद रेगे, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट, संतोष शिरसाट, गंगाराम सडवेलकर, तरबेज शेख, अय्यास खुल्ली, अजीम खान, नझिर शेख, आत्माराम ओटवणेकर,जयराम डिगसकर, लालू पटेल, प्रसाद सावंत-भोसले आदी उपस्थित होते.

ruchira top