शिवजयंती उत्सव निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिंदर शाखा यांचा उपक्रम
शुक्रवार 20 फेब्रुवारी रोज आयोजन
मालवण | प्रतिनिधी :- चिंदर गावठाण वाडी सातेरी मंदिर नजीक असलेल्या मिलिंद चिंदरकर यांच्या निवासस्थानी शिवजयंती उत्सवाचे अवचैत्य साधून शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 रोज सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिंदर शाखा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
नामवंत तज्ञ ऑप्टिशियन यांच्या कडून कॉम्प्युटराईज्ड मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. तपासणी नंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व 450 रुपये अशा कमी किमतीत चष्मा उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती समीर लब्दे यांच्या वतीने देण्यात आली. अधिक माहिती साठी मोबा: 8208026221 या क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उबाठा चिंदर शाखा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

चिंदर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर!
