नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी दिली माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण व परिसरातील मच्छीमार व मत्स्यव्यसाईक यांना सीआरझेड क्षेत्रातील पारंपारिक बांधकाम संदर्भात प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. संबंधित नोटीसाना उत्तर देण्यासाठी दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ ही तारीख देण्यात आली आहे. अन्यथा संबंधित बांधकामांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर नोटीसला सीआरझेड कायद्याच्या अंतर्गत पारंपारिक मच्छीमार व मत्स्यव्यवसाय संदर्भात तरतुदी यांचा आधार घेऊन कायदेशीर उत्तर दिले जाणार आहे.
तरी ज्या मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांना किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकाम संदर्भात नोटीस आल्या असतील त्यांनी तत्काळ संपर्क साधावा ही विनंती.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी आमदार निलेश राणे आणि संबंधित विषयातील विशेष कायदेशीर सल्लागार आणि स्थानिक नगरसेवक, मच्छीमार संघटना - सहकारी संस्था प्रतिनिधी, यांच्या उपस्थितीत मच्छीमार व मत्स्यव्यसाईक यांची सक्षम बाजू मांडली जाणार आहे. प्रशासनाने पाठविलेल्या नोटीसीला कायदेशीर उत्तर तयार करण्यासाठी तातडीने संपर्क साधावा. तसेच उद्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केले आहे.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ प्रांत कार्यालय येथे मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक सोमवारी बाजू मांडणार
