Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण तालुका माध्यमिक अध्यापक संघाचा शाळा भेट दौरा उत्साहात संपन्न…

मालवण तालुका माध्यमिक अध्यापक संघाचा शाळा भेट दौरा उत्साहात संपन्न…

मालवण :- शिक्षकांच्या प्रश्नांना थेट भिडण्याची भूमिका आणि संघटनात्मक बांधिलकीचा ठसा उमटवणारा मालवण तालुका माध्यमिक अध्यापक संघाचा शाळा भेट दौरा सोमवार, दिनांक १९ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दौऱ्याअंतर्गत मालवण तालुक्यातील ओझर, वांयगणी, आचरे, त्रिंबक, आडवली, पोईप व कट्टा अशा एकूण सात माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देत शिक्षकांशी थेट संवाद साधण्यात आला.

या शाळा भेट दौऱ्यास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, जिल्हा प्रतिनिधी शिवराम सावंत, मालवण तालुका अध्यक्ष संभाजी कोरे व तालुका सचिव प्रवीण साबळे हे मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या नेतृत्वाने प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षकांच्या अडचणी ऐकून घेत, संघटना केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असल्याची जाणीव करून दिली.

दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आयोजित इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मालवण तालुका माध्यमिक अध्यापक संघ पुरस्कृत शाळांमधील कर्मचारी वर्गासाठी आयोजित सेमी हॉलीबॉल स्पर्धा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये खेळाची व संघभावनेची जोपासना करण्यासाठी या उपक्रमांत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या भेटीदरम्यान शाळांना व शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. संच मान्यता, जाचक परिपत्रक दिनांक १५/३/२०२४, टी.ई.टी. परीक्षा, आभा कार्डमुळे प्रलंबित राहिलेली वैद्यकीय प्रकरणे, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, तसेच मुख्याध्यापक मान्यता यांसारख्या प्रश्नांमुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता यावेळी स्पष्टपणे मांडण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी शिक्षकांना संयमपूर्ण व समाधानकारक मार्गदर्शन केले.

शिक्षकांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माध्यमिक अध्यापक संघटनेचे शिष्टमंडळ हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी ठाम व आग्रही भूमिका घेईल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या शाळा भेट दौऱ्यास तालुक्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माध्यमिक अध्यापक संघ ही आजही शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणारी, शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला ठामपणे व निर्भीडपणे वाचा फोडणारी मातृ संघटना असल्याचा नावलौकिक आजही तितक्याच ठामपणे अबाधित असल्याचा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.

एकूणच हा शाळा भेट दौरा केवळ औपचारिक न राहता शिक्षकांमध्ये संघटनेबद्दल विश्वास, आशा व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला असून, संघटनात्मक बळ अधिक दृढ करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

rapan bottom