Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जिल्हा परिषद पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार

जिल्हा परिषद पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार


खासदार नारायण राणेंचाच निर्णय अंतिम

महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध : मंत्री नितेश राणे

कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी दिसते. मात्र एका जागेसाठी अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे. उबाठा पक्षासारखी परिस्थिती आमची नसून उमेदवार शोधण्याची गरज आम्हाला पडत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ना. नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याच्या माध्यमांतील बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले. 

त्याचप्रमाणे सत्तेतील सर्व पदे उपलब्ध असून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रत्येकी पाच स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोणालाही नाराज होण्याची गरज नाही, असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.

तसेच रविवारी भाई सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना ते  ना. नितेश राणे म्हणाले, भाई सावंत हे कडवे व निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांना पुन्हा पक्षात ताकदीने उभे केले जाईल. त्यांच्या मतदारसंघात दोन जागा शिवसेना लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक गाव व मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते. खासदार नारायण राणे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेस च्या जागे बाबत चर्चा सुरू आहे. चर्चेनंतर त्यांना किती आणि कोणत्या मतदारसंघात जागा द्यायच्या याबाबत सध्या विचार सुरू असल्याचेही नाम. नितेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान ठाकरे गटाचा समाचारही त्यांनी घेतला, ते म्हणाले मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू व मराठीच असणार आहे. राणेंना संपवण्याच्या घोषणा करणारेच आज मातीमोल झाले आहेत. राणे संपले अस म्हणणारी ठाकरे सेना आणि नेते स्वतःचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसवू शकलेले नाहीत. भाजपात पक्ष प्रवेश होण्यासाठी रांग फार मोठी असते. सुरुवातीला फायद्याचे प्रवेश करून घ्यायचे असतात, तर फायदा नसणारे प्रवेश विचार करून आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्याठिकाणी कोणताही त्रास होणार नाही, कार्यकर्ते डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेऊन घ्यायचे असतात, असेही ना. नितेश राणे म्हणाले.

तर संजय राऊत आणि त्यांच्या मालकाकडे काय शिल्लक नाही. त्यांना पाठीचा कणा नाही त्यांना नाक घासाव लागणार. आमची महायुती भक्कम आहे. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांच्या बारशात जाऊन पेढे खायची सवय आहे, अशा शब्दात ना. नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

rapan bottom