Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वराडकर हायस्कुल कट्टा चे कला शिक्षक समीर चांदरकर यांचा राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत  प्रथम क्रमांक

वराडकर हायस्कुल कट्टा चे कला शिक्षक समीर चांदरकर यांचा राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत  प्रथम क्रमांक


मालवण | प्रतिनिधी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने हिंगोली येथे घेण्यात आलेल्या  राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर  यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्री चांदरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे .


शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील अध्यापन प्रक्रियेला  प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कलाशिक्षक समीर चांदरकर  यांनी डिजिटल शिक्षण या विषयावर आधारित साकारलेल्या रांगोळीला मालवण तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर त्यांची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली होती . सांगली येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरीय स्पर्धेतही  समीर चांदरकर हे विजेते ठरल्याने त्यांची निवड हिंगोली येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील आठ शैक्षणिक विभागातील विजेते ठरलेल्या तब्बल चाळीस स्पर्धकांचा समावेश होता. या चाळीस स्पर्धकांशी झालेल्या स्पर्धेतून समीर चांदरकर  यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

हिंगोली येथे भा. मे. पुंटवाड प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली, जगदीश करडे राज्य समन्वयक/अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोलीच्या जयश्री आठवले,स्पर्धा समन्वयक  वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री चांदरकर यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.


श्री चांदरकर  यांचे सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीमती  कविता शिंपी , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, वराडकर हायस्कूल कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री महेश भाट,कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे  अध्यक्ष अजयराज वराडकर तसेच संस्था चालक,  शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom