Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भविष्यात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज !

भविष्यात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज !

अन्यायाविरुद्ध संघटित होऊन लढा द्या, यश नक्कीच मिळेल…

अशोक सावंत यांचे प्रतिपादन ; महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा अधिवेशन उत्साहात

कुडाळ : अन्यायाच्या विरोधात नेहमी आवाज उठवला पाहिजे. महावितरण कामगारांवर जेव्हा अन्याय झाला, तेव्हा आम्ही संघटितपणे लढा दिला आणि त्यात यशस्वी झालो. भविष्यात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा वीज कंत्राटी कामगारांचे नेते अशोक सावंत यांनी केले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन कुडाळ येथे पार पडले. यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, कोणतेही यश मिळवायचे असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही. गेली अनेक वर्षे आम्ही लढा देत आहोत. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून एकाच वेळी ५५० कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले होते. भविष्यातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता तक्रारी करण्यापेक्षा काम करण्यावर भर द्या आणि आपली ओळख निर्माण करा."
या अधिवेशनाला राज्य नेते सागर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही केवळ संघटना नसून कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी चालवलेली एक चळवळ आहे. संघटना अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. हा लढा आम्ही अविरत सुरू ठेवणार आहोत.
या अधिवेशनात केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेले माजी जिल्हाध्यक्ष आनंद लाड आणि नूतन जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर व त्यांच्या टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आनंद लाड यांनी सांगितले की, केंद्रीय पातळीवर कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वांच्या हितासाठी करेन. संदीप बांदेकर यांनी तळागाळातील प्रत्येक कामगाराला पगारवाढ आणि नवीन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी राज्य पातळीवरील नेते सत्यविजय जाधव, गोपाळ कुलकर्णी, कृष्णांत बच्चेपाटील, दिनेश तांबे, मोहन गावडे, सचिन राघव, सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, महेश राऊळ यांच्यासह महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण विभागातील जिल्ह्यातील असंख्य वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते.

rapan bottom