महिला जखमी ; मालवण बाजारपेठ येथील घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रविवारी मालवण बाजारपेठ येथे एका महिलेला मोकाट गुरांनी धडक दिली. यात महिलेला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले.
संबंधित दुखापतग्रस्त महिला व तीच्या नातेवाईक यांनी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांची भेट घेतली. घडलेला प्रकार सांगत मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक संजय पवार व आरोग्य विभाग लिपिक मंदार केळूसकर यांना याबाबत सूचना केल्या आहेत. मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही व तातडीने उपाययोजना गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच शहरातील भटके कुत्रे यांचाही प्रश्न सोडवण्यासाठी कश्या प्रकारे उपाययोजना राबवल्या जात असून आगामी काळात अधिक गतिमान पणे कार्यवाही केली जाईल याकडे प्राधान्याने लक्ष द्या. अश्या सूचना पाटकर यांनी दिल्या आहेत.

मोकाट गुरांची महिलेला धडक
