Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

मालवण नगरपरिषद निवडणुक | पाचव्या दिवशी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल

मालवण नगरपरिषद निवडणुक | पाचव्या दिवशी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल

नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

मालवण : आगामी मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, पाचव्या दिवशी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात पाचव्या दिवशी एकूण १२ उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहेत. सर्व उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहेत.

दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे ८, कॉँग्रेस पक्षाचे २, भारतीय जनता पक्षाचा (भाजप) १ आणि अपक्ष १ असे उमेदवारी अर्ज आहेत.

प्रभाग क्र. १ अ या जागेसाठी कॉँग्रेस तर्फे संदेश कोयंडे तर प्रभाग क्र. १ ब या जागेसाठी शिवसेना उबाठा कडून पूजा जोगी, प्रभाग क्र. ६ अ या जागेसाठी शिवसेना उबाठा मधून महेश जावकर तर प्रभाग क्र. ६ ब या जागेसाठी शिवसेना उबाठा कडून स्मिता सळमळकर तर अपक्ष श्वेता सळमळकर, प्रभाग क्र. ७ ब या जागेसाठी शिवसेना उबाठा कडून गौरी मायेकर, प्रभाग क्र. ८ अ या जागेसाठी शिवसेना उबाठा तर्फे मंदार ओरसकर तर प्रभाग क्र. ८ ब या जागेसाठी कॉँग्रेस कडून रूपाली सकपाळ, प्रभाग क्र. ९ अ या जागेसाठी भाजपा मधून पंकज सादये, शिवसेना उबाठा तर्फे निलेश दूधवडकर, प्रभाग क्र. ९ ब या जागेसाठी शिवसेना उबाठा कडून माधुरी प्रभू, प्रभाग क्र. १० अ मधून शिवसेना उबाठा कडून तपस्वी मयेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या जवळ सादर केले.

मालवणात चौथ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

काल ठाकरे शिवसेनेने तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात प्रभाग २ अ मधून उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि २ ब मधून अनिता पॉली गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर प्रभाग ३ अ मधून ठाकरे शिवसेनेतर्फे उमेश अरविंद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

१७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. तर २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.

rapan bottom