Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

भाजपाने दिलेल्या 16 : 4 या फॉर्मुल्यानुसार शिवसेनेने युती करावी

भाजपाने दिलेल्या 16 : 4 या फॉर्मुल्यानुसार शिवसेनेने युती करावी



भाजपा 16 नगरसेवक जागा आणि नगराध्यक्ष निवडणूक लढणार

शिवसेनेने 4 नगरसेवक जागा लढवाव्यात

मालवण भाजपाचा युती प्रस्ताव

भाजपा शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती

मालवण : हा मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा आहे. शिंदे सेनेचे अस्तित्व देखील राणे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच जिल्ह्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी १६ जागा भाजपा तर ४ जागा शिवसेना हा फॉर्म्युला स्वीकारत भाजपच्या नेतृत्वाखालील युतीत सामील व्हावे असे आवाहन भाजप शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज रात्री आयोजित पत्रकार परिषदेत केले.

हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मंदार केणी, बाबा परब, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, संतोष गांवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. मोंडकर म्हणाले, खासदार नारायण राणे यांनी जाहीर केले होते की, जिल्ह्यातील अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असणार. मालवण नगर परिषदेचा नगराध्यक्ष देखील भाजपचाच असला पाहिजे यावर आमच्याकडे शिक्कामोर्तब झाले आहे.

महायुती संदर्भात काल झालेल्या चर्चेदरम्यान शिंदे सेनेने १२ नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपला असावा अशी मागणी केली होती तर भाजपने 16 नगरसेवक जागा व नगराध्यक्ष अशी मागणी ठेवली. हा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. गेल्या २५ वर्षांचा इतिहास पाहता मित्रपक्षाला जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे आता आहे असा फॉर्म्युला असावा अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

शिंदे सेनेकडे सध्या मालवणमध्ये जास्त काहीच नगरसेवक नसताना भाजपने चार जागा देण्याची तयारी दाखवली आहे. भाजपच्या कोअर कमिटीने शिंदे सेनेसोबतच्या युतीमधील संघनात्मक अडचणी ठळकपणे समोर आणताना गेल्या वर्षभरात आमदार निधी आणि खासदार निधीच्या वाटपामध्ये युतीचा धर्म पाळला नाही याबाबत सांगितले. विकासकामांमध्ये भाजपला सन्मानाची अपेक्षा पूर्ण झाली नाही असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या चर्चेत गुंता कायम आहे. मात्र भाजपने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. भाजपाकडे नगरसेवकांच्या २० जागांसाठी ५२ अर्ज प्राप्त झाले तर नगराध्यक्ष पदासाठी ८ अर्ज प्राप्त झाले. अशा स्थितीत भाजपला नगराध्यक्ष व १६ जागा लढवण्यास तयार आहे. तर शिंदे शिवसेनेला ४ जागा देण्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.

ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे, संयोजक माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत मालवणातील ६० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार राणे यांचा सन्मान राखला जावा यासाठी मित्र पक्ष शिंदे शिवसेनेने १६-४ चा फॉर्म्युला स्वीकारत महायुतीत सहभागी व्हावे असे आवाहनही श्री. मोंडकर यांनी केले.

rapan bottom