Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

'त्या' समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी

'त्या' समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी

चिवला बीच येथे नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप

अज्ञाता विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालवण | प्रतिनिधी : मालवण चिवला बीच येथील ख्रिस्ती धर्मियांच्या सांताक्रुज उपासना स्थानावरील पवित्र क्रॉस व शेजारील फातिमा मातेची स्थापित प्रतिमा रात्री अज्ञात समाजकंटकाकडून मोडतोड करून फेकून देण्यात आली.

हे दुषकृत्य केवळ ख्रिस्ती धार्मियांच्याच नव्हे तर अगदी इतिहासकाळा पासून मालवणात गुण्यागोविंदाणे एकत्रितपणे रहात आलेल्या सर्व धार्मियांच्या नजरेतून ही धक्कादायक व निषेधार्हच आहे. असे निवेदन फादर यांच्या वतीने नागरिकांच्या उपस्थितीत पोलीसांना देण्यात आले.

याबाबत मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली.

दरम्यान, या प्रकाराबद्दल ख्रिस्ती बांधवांसह मालवणतील सर्वपक्षीय प्रतिनिधी तसेच नागरिकांनी चिवला बीच पवित्र क्रॉस ठिकाणी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर सायंकाळी नागरिकांनी मालवण पोलिसांची भेट घेऊन या गंभीर प्रकाराचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी ही उपस्थित होते.

rapan bottom