जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील चाफेखोल गावचे सरपंच रविणा राजेश घाडीगावकर तसेच उपसरपंच रविंद्र जाधव यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
मंगळवारी रात्री हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह महेश मांजरेकर, विजय निकम, बंडू गावडे, संतोष गावकर, बूथ अध्यक्ष बळीराम शिंदे, सोमनाथ पानवलकर यांसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

