▪️ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते
चौके : मालवण तालुक्यातील मालवण-कसाल हमरस्त्यावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले चौके हे गाव. चौके गावची रक्षणकर्ती नवसाला पावणारी पाषाणरुपी स्वयंभू ग्रामदेवता श्री भराडी देवी. या देवीचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 ते गुरुवार दि. 13 डिसेंबर 2025 या कालावधीत मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे.

कोकणात प्रत्येक गावागावात विविध देवतांच्या वार्षिक जत्रा वर्षानुवर्षे परंपरागत मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात. अशीच सिधुंदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिरेखाणींसाठी प्रसिध्द असलेल्या चौके गावातील ग्रामदैवत पाषाणरुपी आई भराडी देवीची वार्षिक जत्रा प्रतिवर्षी प्रमाणे कार्तिक कृष्ण सप्तमीला म्हणजेच मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
बहीण भाऊ भेट परंपरा जपणारी ही जत्रा
चौके ग्रामदेवता आई भराडी देवीचा जत्रौत्सव झाल्यानंतर कार्तिक कृष्ण नवमीला बहीणभाऊ भेट म्हणून होणारी चौके-आंबेरी येथील ग्रामदैवत श्री देव जैन-सकलेश्वर देवाची जत्रा झाल्यानंतर दशमीचे गाडगे फोडून चौके देवी भराडी-आंबेरी जैन सकलेश्वर जत्रौत्सवाची सांगता होते.

