Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

मालवण-कुडाळ राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार : आमदार निलेश राणे

मालवण-कुडाळ राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार : आमदार निलेश राणे

आंबडोस माजी सरपंच उबाठा जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

मालवण : गावागावात जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करत असताना मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी खेचून आणणे हेच आपले पाहिले लक्ष आहे. विधानसभा, मंत्रालय स्तरावरून विकासनिधी प्राप्त होत असताना राणे हे आडनाव असल्यामुळे अधिक सोपे होते. यापुढे मालवण कुडाळ मतदारसंघ सर्वाधिक विकास निधीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासह राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी मालवण आंबडोस येथे बोलताना व्यक्त केला.

आंबडोस गावाचे माजी सरपंच तथा उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकारी व ग्रामस्थांसह शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी माजी सरपंच दिलीप परब तसेच अजिंक्य परब, निवृत्ती परब व सहकारी यांच्या वतीनेही आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह माजी सरपंच दिलीप परब, सरपंच सुबोधिनी परब, माजी सरपंच विष्णू परब, तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, शहर प्रमुख दिपक पाटकर, जेष्ठ पदाधिकारी बाळू कुबल, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सचिव राहुल बागवे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभि लाड, माजी सरपंच वरवडेकर, नांदरुख सरपंच भाऊ चव्हण, श्याम वाक्कर, धोंडी नाईक, युवासेना विभागप्रमुख विशाल धुरी, पशा नाईक यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जनार्दन नाईक, सुरेश परब, चंद्रकांत परब, सुलोचना राणे, सुधा परब, प्रणाली चव्हाण, पूजा परब, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

राणे साहेबांना 100 टक्के मताधिक्य देणारा गांव : दत्ता सामंत

आंबडोस गाव हा 1990 पासून नेहमीच राणे साहेबांसोबत राहिला. 100 टक्के मताधिक्य देणारा हा गांव आहे. या गावच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 25 लाख निधी मंजूर होईल. सोबतच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध असल्याचे दत्ता सामंत म्हणाले. शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका यापुढेही असाच सुरु राहील असे दत्ता सामंत यांनी सांगितले. यावेळी बाळू कुबल यांनीही आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.

आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत ठसा उमटवला

आमदार निलेश राणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीतून विधानसभेत ठसा उमटवला. मतदारसंघातील जनतेला विकासकर्यातून न्याय मिळवून देत आहेत. त्यांच्या कार्य शैलीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करतं असल्याचे माजी सरपंच दिलीप परब यांनी सांगितले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा विशेष उल्लेख दिलीप परब यांनी केला. आम्ही राणे साहेबांचीच माणसे. काही गैरसमजातून राणे कुटुंबापासून दूर होतो. आता पुन्हा एकत्र आलो यांचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेत प्रवेश

आंबडोस माजी सरपंच दिलीप परब आंबडोस गावातील अनेक उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात विजय नाईक, दीपलक्ष्मी परब, नारायण परब, आनंद साळगावकर, बाबी परब, दिपक नके, दीपिका नके, संजय साळगावकर, अजिंक्य परब, निवृत्ती परब, मारुती परब, रामकृष्ण परब, शैलेश कदम, प्रकाश चव्हाण, सत्यवान साळगावकर, प्रकाश दळवी, दीपक परब, विष्णू साळगावकर, समृद्धी दळवी, सुंदरी चव्हाण, सायली साळगावकर, सुहासिनी दळवी, निकिता परब, रिया इंदुलकर, योजना परब, आरती परब, हरिश्चंद्र परब, हर्षदा परब, अनिकेत करावडे, शांताराम साळगावकर, विश्वनाथ करावडे, दर्शना करावडे, गुरुनाथ परब, दत्ताराम परब, कृष्णाजी करावडे, एकनाथ नाईक, भरत बुठ्ठे, जनार्दन नाईक, विवेक सावंत, अमित राणे, विनायक सावंत, दयानंद पाटकर, मंगेश नाईक, पुजा कदम, प्रणाली चव्हाण, पूर्णानंद कदम, सखाराम नाईक, जयश्री नाईक, राजश्री नाईक, नवनाथ परब, सुलोचना साबाजी परब, साबाजी परब, पुंडलिक परब, दिपक परब, प्रकाश परब, संगीता करावडे, रुपाली परब, ममता नाईक, संदेश परब, विनोद परब, ओंकार परब, राजश्री परब यांसह मोठया संख्येने अन्य ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom