Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

MLA Nilesh Rane | मालवण नगरपरिषद महाराष्ट्रात आदर्शवत आणि दर्जेदार अशीच बनवणार : आ. निलेश राणे

MLA Nilesh Rane | मालवण नगरपरिषद महाराष्ट्रात आदर्शवत आणि दर्जेदार अशीच बनवणार : आ. निलेश राणे



मालवण शहरातील उबाठा गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत



मालवण : जनतेची सेवा करत असताना सर्व विकासकामे पूर्ण करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे. शेकडो कोटी निधी या मतदार संघात प्राप्त झाला असून आगामी काळातही विकासनिधी कमी पडू देणार नाही. होत असलेली विकासकामे ही दर्जेदार झालीच पाहिजे याकडेही आपले प्राधान्याने लक्ष राहील. मालवण नगरपरिषद महाराष्ट्रात आदर्शवत आणि दर्जेदार अशीच बनवणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दिपक पाटकर, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, सहदेव बापार्डेकर, बाळू तारी, जॉन नरोना, जगदीश गांवकर, राजू बिडये, महेश सारंग, विलास मुणगेकर, राजन परुळेकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, शाम वाक्कर, अरुण तोडणकर, शेखर गाड, नारायण धुरी, भाऊ मोरजे, मंदार लुडबे, वसंत गांवकर, शिवाजी केळूसकर, आबा शिर्सेकर, संदीप भोजणे, ऋषिकेश सामंत, महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


आमदार निलेश राणे व्हिजन असणारे नेतृत्व

आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन कुडाळ मालवण मतदार संघात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु आहे. मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास आमदार निलेश राणेच करू शकतात. व्हिजन असणारे ते कर्तृत्ववान नेतृत्व आहे. असं सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी आ. निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला. 

आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जनतेची सेवा करायची आहे : पूनम चव्हाण

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात पुढील 15 ते 20 वर्षे काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. हे आमचे भाग्यच आहे. राणे कुटुंबाचे आशीर्वाद घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी आगामी निवडणूक लढवणार. जनतेसोबत आणि मतदारांसोबत नेहमीच मी प्रामाणिक राहणार असल्याचा शब्द आताच देते. असे प्रवेशकर्त्या पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले.



प्रवेशकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते

यावेळी उबाठातील अनेक पदाधिकारी, नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात उबाठा तालुका समन्व्यक पूनम चव्हाण, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, माजी नगरसेविका निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, शाखाप्रमुख मोहन मराळ, शाखाप्रमुख दिगंबर बगाड, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चव्हाण, उपशहर प्रमुख बिलावर शेख, आनंद मालवणकर, माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण, ऋत्विक चव्हाण, वेदांत चव्हाण, नागेश चव्हाण, चंदन जाधव, साईल जाधव, संदेश डिकवलकर, श्रीकांत मालवणकर, भरत मालवणकर, शुभ्रा डिकवलकर, महेश कोळंबकर, चंद्रकांत जाधव, ग्रीश जाधव, रमेश कासले, महेश मालवणकर, गणेश मालवणकर, अमोल चाफेखोलकर, राहुल मोरे, सीमा कोळंबकर, माधुरी जाधव, शाली पेंडुरकर, नूतन मालवणकर, यश चव्हाण, श्रीकृष्ण चव्हाण, यासह अन्य नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.

मालवण कुडाळ मध्ये शिवसेनाच नंबर एकचा पक्ष राहणार : आ. निलेश राणे

शिवसेनेच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिक काम करणारे विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत. शिवसेनेच्या कार्याची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल असे कार्य सुरूच राहील. विकासनिधीत शिवसेना म्हणून आपण कुठेच कमी पडणार नाही. कुडाळ मालवणमध्ये शिवसेना नंबर एकचाच पक्ष राहणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom