अध्यक्षपदी अरुण भोगले : उपाध्यक्षपदी अशोक सावंत, बाबा परब यांसह अन्य कार्यकारणी निवड
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळ नवी कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अरुण शांताराम भोगले तर उपाध्यक्ष पदी अशोक वासुदेव सावंत तसेच संदीप (बाबा) मधुकर परब यांसह अन्य पदाधिकारी निवड करण्यात आली आहे.
मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळ शुक्रवारी झालेल्या नवीन व जुन्या कार्यकारीणी सदस्यांच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे पदाधिकारी निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी अरुण शांताराम भोगले, उपाध्यक्ष संदीप (बाबा) मधूकर परब, उपाध्यक्ष अशोक वासुदेव सावंत, सचिव आशिष बळीराम परब, उपसचिव प्रमोद लक्ष्मण मोहिते, सहसचीव सुधिर रामचंद्र साळसकर, खजिनदार सुधिर चिंतामण धूरी, सदस्य संतोष बाबाजी गावडे, विजय बाळकृष्ण परब, गोपीनाथ सिताराम पालव, जयंद्रथ बुधाजी परब, प्रदिप प्रभाकर सावंत, डॉ. गोपाळ रामचंद्र सावंत, विजय कालीदास सावंत, विनायक श्रीधर परब, श्रीकृष्ण दत्ताराम परब, संजय राजाराम मिराशी, निमंत्रीत सदस्य अर्जुन अनाजी राणे, संतोष दिगंबर पालव, हेमंत पाडावे, महादेव सुर्वे, सलागारपदी प्रताप सहदेव बागवे यांची निवड करण्यात आली आहे.
▪️ अमित खोत | मालवण

