रामगड सरपंच शुभम मटकर यांनी वेधले जिल्हा डाक निरीक्षक यांचे लक्ष
मालवण | प्रतिनिधी : रामगड पोस्ट ऑफिस मधे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. याबाबत रामगड सरपंच शुभम मटकर व ग्राम सदस्य अमित फोंडके यांनी जिल्हा डाक निरीक्षक निशांत शुक्ला यांचे लक्ष वेधले.
रामगड गावामधील पोस्ट ऑफिस मधे पूर्वी बीएसएनएल ची इंटरनेट सेवा होती. त्याच्या अनिमियतेबाबत तक्रार करून त्याबाबत ग्रामपंचायत रामगड मार्फत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर पीओसीबी यंत्रणेसाठी खाजगी पुरवठादार नेमून इंटरनेट सुविधा पूर्ववत झाली. मात्र या नविन यंत्रणेची सुविधा पूर्णपणे सुरू झाली नसून ग्रामस्थांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
रामगड पोस्ट ऑफिस मधे पंचक्रोशी मधील ग्रामस्थ येत असून ही सुविधा लवकर पूर्ववत करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन पोस्ट विभागाकडून देण्यात आले.
▪️अमित खोत, मालवण

