मालवण : मालवण तालुक्यातील पराड येथील श्री दुर्गादेवीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक वद्य तृतीया शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा अर्चा, दुपारी महाप्रसाद, ओटी भरणे, सायंकाळी भजने त्यानंतर पालखी प्रदक्षिणा होऊन रात्री खानोलकर दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी समस्त तारी, पराडकर बंधु तसेच भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. समिर सुभाष तारी यांनी केले आहे.

पराड येथील श्री दुर्गादेवीचा ८ रोजी जत्रोत्सव
